top of page

Satmya-Oksatmya by Dr. Japa Jayant phadke

Writer's picture: AyuPediaAyuPedia

आयुर्वेदातील सात्म्य - असात्म्याचा अभ्यासच मुळात रोगाचे निदान आणि रुग्णचिकित्सार्थ उपयुक्त आहे. रुग्णाचा देश, वय, काळ , व्याधी आदि नुसार त्याला कोणता आहार-विहार योग्य व कोणता अयोग्य हे ठरते. म्हणून सात्म्यासात्म्याचा विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

'ओकसात्म्य' म्हणजे साम्यच्या प्रकारांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार...!! आपण आधी सात्म्य म्हणजे काय याबाबत विचारविनिमय करु.

सात्म्यं नाम तद् यदात्मन्युपशेते; सात्म्यार्थो ह्युपशयार्थः| - च. वि. १/२०
देशानामामयानां य विपरीतगुणं गुणैः। सात्म्यमिच्छन्ति सात्म्यज्ञानश्चेष्टितं चाद्यमेव च ॥ -च.सू. ६/५०

आपल्या शरीरासाठी जे सुखकारक असते ते म्हणजे ‘सात्म्य’ देश व रोग यांच्या विपरीत गुणांच्या व विपरीत कार्य करणारा आहार आणि विहार हा त्या देश व रोगासाठी सात्म्य समजावा. यामुळेच सात्म्य अर्थात उपशय म्हटले आहे.

मधुर रस, दुग्ध, घृत हे आजन्म सात्म्य सांगितलेले आहेत.

तत् त्रिविधं प्रवरावरमध्यविभागेन ; सप्तविधं तु रसैकैकत्वेन सर्वरसोपयोगाच्च| तत सर्वरसं प्रवरम् , अवरमेकरसं, मध्यं तु प्रवरावरमध्यस्थम्। तत्रावरमध्याभ्यां सात्म्याभ्यां क्रमेणैव प्रवरमुपपादयेत् साम्यम्| सर्वरसमपि सात्म्यमुपपन्नः प्रकृत्याद्युपयोक्रष्टमानि सर्वाण्याहारविधिविशेषायतनान्यभिसमीक्ष्य हितमेवानुरुध्येत || - च. वि. १/२०

सात्म्याचे प्रकार केलेले आहेत.

  • त्रिविध -

  1. प्रवर (श्रेष्ठ)

  2. मध्य

  3. अवर (हीन)

  • सप्तविध :

  1. एकेका रसाचे सात्म्य (अवर) - मधुर, अम्ल, लवण, तिक्त, कटु, कषाय

  2. सर्वरस सात्म्य (प्रवर)

  3. यांच्या मधील मध्य सात्म्य

  • चतुर्विध सात्म्य -

  1. ऋतुसात्म्य

  2. ओकसात्म्य

  3. देशसात्म्य

  4. व्याधीसात्म्य

उत्तरोत्तर बलवान


1. ऋतुसात्म्य -

तस्याशिताद्याहाराद्बलं वर्णश्च पद्यते । यस्यर्तुसात्म्यं विदितं चेष्टाहार व्यपाश्रयम् | - च. सु. ६/३

कोणत्या ऋतुत कोणता आहार-विहार अनुकूल वा प्रतिकूल' असतो हे जाणणे म्हणजे ऋतुसात्म्य होय


2. देशसात्म्य -

देश: पुन: स्थानं स द्रव्यागामुत्पत्तिप्रचारौ देशसात्म्यं चाचष्टे | - च. वि. १/२२ (५)
देशसात्म्येन च देशविपरीतगुणं सात्म्यं गृह्यते यथा आनूपे उष्णरुक्षादि, धन्वनिच शीतस्निग्यादि| (टीका)

रोग्याची शारीरिक स्थिती योग्य प्रकार जाणण्यासाठी व औषधींचे गुणधर्म समजून घेण्यासाठी देश अर्थात भूमीचे ज्ञान महत्त्वपूर्ण आहे. जसे आनूप देशातील व्यक्तीला उष्ण, रुक्ष आहार सात्म्य आहे याउलट जांगल प्रदेशातील व्यक्तींना शीत, स्निग्ध असा आहार-विहार स्वस्थ ठेवणारा ठरतो.


3. व्याधीसात्म्य -

व्याधी ज्या गुणांच्या आहे त्याच्या विपरीत गुणधर्माच्या आहार - विहार व्याधीसात्म्य समजावा. जसे निराम संधीगत वातात तीळ तेल, नारायणतेल, अनुवासन बस्ती, लाक्षा, गुग्गुक कल्प यांसारखी बृंहण चिकित्सा दिली जाते.


4. ओकसात्म्य -

उपशेते यदौचित्यादोकः सात्म्यं तदुच्यते। - च. सू. ६/४९

जो केवळ निरंतर अभ्यासाने बाधाकर ठरत नाही म्हणजेच विकार उत्पन्न करत नाही त्यास ओकसात्म्य' समजावे.

गङ्गाधरस्तु ओकसात्म्यम्' इति पठति, ओकादौचित्यात् सात्म्यमित्योकसात्म्यमित्युच्यते इति च व्याख्यानयति |

'ओक' या शब्दाचा अर्थ 'घर'...!!! अर्थात सवय होऊन जाणे. मनुष्यप्राणी ज्या प्रकारचा आहार नित्य, प्रतिदिन सेवन करतो ते पदार्थच त्याच्यासाठी सात्म्य म्हणजेन्य अनुकूल बनतात. यालाच ओकसात्म्य म्हणले आहे.

उपयोक्ता पुनर्यस्तमाहारमुपयुङ्क्ते यदायत्तमोकसात्म्यम् इत्यष्टावाहारवेधिविशेषायतनानि व्याख्यातानि भवन्ति। - च. वि. १/२२
यदायत्तमोकसात्म्यमिति भोक्तृपुरुषापेक्षं ह्यभ्याससात्म्यं भवति; कस्यचिद्धि किश्चिदेवाभ्यासात पथ्यमपथ्यं वा सात्म्यं भवति ||२|| - च. वि. १ (चक्रदत्त टीका)

जो आहाराचा उपयोग करतो त्यास उपयोक्ता म्हटलेले आहे. ओकसात्म्य हे त्याच्या अधीन असते. रुग्ण चिकित्सार्थ आपल्याकडे आल्यानंतर कोणत्या गोष्टी त्याला ओकसात्म्य झालेल्या आहेत याची माहिती असणे आवश्यक असते.

सात्म्यतश्चेति सात्म्यं नाम तद्यतसातत्येनोप सेव्यमानमुपशेते | तत्र ये घृतक्षीरतैलमांसरससात्म्याः सर्वरससात्म्याश्चये बलवन्त: क्लेशसहाश्चिरजीविनश्य भवन्ति, रुक्षसात्म्याः पुनरेकसात्म्याश्चये ते प्रायेणाल्पबला अल्पक्लेशसहा अल्पायुषाऽल्पसाधनाश्व भवन्ति, रुक्षसात्म्याः पुनरेकरससात्म्याश्च, व्याप्तिश्रसात्म्यास्तु ये ते मध्यबलाः सात्म्यनिमित्ततो भवन्ति। - च. वि. ८/११८
सात्म्यतश्चेत्यत्र सात्म्यशब्देन ओकसात्म्यमुच्यते, प्रकृतिसात्म्यादीनां भेषजादिपरीक्षयैव परीक्षितत्वादिति ज्ञेयम्| - (चक्रदत्त टीका)

जो पदार्थ सतत सेवन करूनही प्रकृतीशी अनुकूल राहतो त्यास सात्म्य (टीकेत-ओकसात्म्य) असे समजावे.

  • घृत दूध,तेल, मांसरस यांचे ज्यांना सात्म्य आहे ते बलवान, कष्ट सहन करु शकणारे दीर्घायु असतात.

  • ज्यांना रुक्ष पदार्थाये सात्म्य असते ते अल्पबल, कष्ट सहन करण्याची अल्पशक्ती असणारे, अल्पायु आणि अल्प साधन युक्त असतात.

  • मिश्रित सात्म्य असणाऱ्या व्यक्ती मध्यम बलवान, मध्यम आयु आणि मध्यम साधन युक्त असतात

विधिशोणितीय अध्यायातही शुध्द रक्त बनण्यासाठी देशसात्म्य, कालसात्म्य व ओकसात्मही आवश्यक असते, असा उल्लेख केलेला आहे.

विधिना शोणितं जातं शुद्धं भवति देहिनाम्| देशकालौकसात्म्यानां विधिर्यः सम्प्रकाशितः || - च. सू. २४/३

च. नि. ६ शोषनिदानातही ओकसात्म्याचा उल्लेख आलेला आहे.

प्रकृतिकरणादयो रसविमाने प्रपञ्चनीयाः अन्न चोपशय: शब्देन उपयोक्ता पुनर्यस्तमाहारमाहरति,यदायत्तमोकसात्म्यम्। - च. नि.६/१०-११ (च. वि.१)

सुश्रुतांनीही ओकसात्म्याचा अर्थ वर्णन केलेला आहे.

ओकसात्म्यमभ्याससात्म्यं ओकशब्दोऽयम् ‘उच्' समवाय इत्यनेन धातुना व्युत्पादित इति व्याख्याति| - सु.शा.१०/१९-२० (डह्वण)

ओकसात्म्य व सात्म्य यातील मुख्य फरक म्हणजे ओकसात्म्यात विरुध्द आहार विहार देखील त्या व्यक्तीस सवयीने सात्म्य, हितकर होतो मात्र इतर सात्म्यात मात्र त्या त्या देश, काळ, ऋतू, व्याधीनुरुप गोष्टी शरीरास अनकूल होणार आहेत की नाही हे ठरते.


दोन्हीतील साधर्म्य म्हणजेच या दोन्ही गोष्टी शरीरास बाधाकर ठरत नाहीत अर्थात दोषदुष्टी घडवून आणत नाहीत. उलट शरीरास हितकर ठरतात.


परदेशात त्या वातावरणात मैद्याचे पदार्थ, मांसाहार,मद्य शीत वातावरणामुळे त्या प्रदेशातील लोकांना

सात्म्य बनलेले असते तेच भारतात तांदूळ, ज्वारी, बाजरी हे पदार्थ सात्म्य बनलेले अहित.

याउलट एखादी व्यक्ती दूध व केळी किंवा दूध, मीठ, भात अनेक वर्ष खात असेल, तिच्यावर त्याचा कोणताही परीणाम झाला नाही तर ते त्या व्यक्तीस 'ओकसात्म्य' झाले असे समजावे.


माधवनिदानकारांनी सात्म्याची सुंदर व्याख्या केलेली आहे.

औषधान्नविहाराणामुपयोगं सुखावहम्। विधादुपशयं व्याधेः सहिसात्म्यमिति स्मृतः|| - मा नि.

रुग्ण व्याधी चिकित्सा देताना सात्म्य औषध, अन्न, विहार यांच्या वैद्याने अवश्य विचार करावा आणि रुग्णास ज्या ओकसात्म्य गोष्टी आहेत त्याकडेही लक्ष द्यावे ज्यामुळे त्याची चिकित्सा 'यशस्वी चिकित्सा' ठरु शकेल.


धन्यवाद...!

The Post by Dr. Japa Jayant Phadke

Copyright @AyuPedia

166 views0 comments

Recent Posts

See All

Satmya - Oksatmya by Soumya Prakash Mohanty

"Satmya" is that, which being used constantly has wholesome effects in body. Oksatmya a type of satmya,is that which suitable to the person.

Satmya - Oksatmya By Dr. Sunil Hariram Pal

Satmya is the one which is conductive to one self. Okasatmya is nothing but conduciveness developed due to continuous intake of a Substance.

Comments


bottom of page